Home / अर्थ मित्र / शेअर बाजार गडगडलेला असतानाही अदानी पॉवरचे शेअर्स तेजीत, कारण काय?

शेअर बाजार गडगडलेला असतानाही अदानी पॉवरचे शेअर्स तेजीत, कारण काय?

जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार चांगलाच कोसळला आहे. त्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने शेअर बाजारातील अस्थिरता केव्हा संपेल...

जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार चांगलाच कोसळला आहे. त्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने शेअर बाजारातील अस्थिरता केव्हा संपेल सांगत येत नाही. त्यामुळे या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. मात्र, अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने याच दिवशी मोठी उसंडी मारली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

सर्वेोच्च न्यायालयाने वीज वितरण कंपन्यांना आदेश देत अदानी पॉवरला ४२०० कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. येत्या चार आठवड्यांत डिस्कॉमकडून हे पैसे अदानी पॉवरला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे अदानी पॉवरच्या शेअरमध्ये चांगलीच वाढ झाली. २५ फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स १२ टक्क्यांनी वाढून १२३.३० पैशांनी बंद झाला. येत्या काही दिवसांत ही तेजी अशीच सुरू राहणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे कदाचित या कंपनीचा शेअर १४०-१४७ रुपायांची पातळी गाठू शकेल असंही तज्ज्ञांचं मत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजस्थानस्थित वीज वितरण कंपनींनी थकबाकी भरली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अपमान झाला होता. या तिन्ही कंपन्यांनी 2022 मधील आदेशाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये अदानी पॉवरला नुकसान भरपाई देण्याच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता या कंपन्यांना अदानी पॉवरला एकूण 4,200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या