Home / News / कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली

कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली

कसारा मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली. यामुळे कल्याण स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलवर मोठा परिणाम झाला. मध्य...

By: E-Paper Navakal

कसारा

मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली. यामुळे कल्याण स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलवर मोठा परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल सेवा २० मिनिटे उशिराने धावल्या. आज सकाळच्या सुमारास कसारा स्थानकाजवळ मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्याने इंजिन आणि एक बोगी पुढे मुंबईच्या दिशेने गेली. काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डब्बा थांबला. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती मिळाली असता ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.

Web Title:
संबंधित बातम्या