Home / News / सुनिता विल्यम्सच्या घरवापसीला आणखी विलंब लागण्याची शक्यता

सुनिता विल्यम्सच्या घरवापसीला आणखी विलंब लागण्याची शक्यता

वॉशिंग्टन- अंतराळवीर सुनिता विल्यम्स व त्यांचा सहकारी बुच विलमोर यांच्या पृथ्वीवर परत येण्याला आणखी विलंब होऊ शकतो. या मिशनची मुदत...

By: E-Paper Navakal

वॉशिंग्टन- अंतराळवीर सुनिता विल्यम्स व त्यांचा सहकारी बुच विलमोर यांच्या पृथ्वीवर परत येण्याला आणखी विलंब होऊ शकतो. या मिशनची मुदत आता ४५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती नासाच्या कमर्शियल क्रु प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी दिली आहे.या मोहिमेला होणाऱ्या विलंबाबद्दल ते म्हणाले की, आम्ही या लोकांना घाईघाईने पृथ्वीवर परत आणणार नाही. सध्या या यानाची स्थिती उत्तम असून त्यातून हेलियम गळतीची समस्या दूर करण्यात आली आहे. अंतराळयानाच्या बॅटरीची स्थितीही उत्तम असून त्या आणखी बराच काळ टिकू शकतात. या यानाच्या परतीच्या प्रवासाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. ती लवकरच निश्चित करण्यात येईल. या यानातील दोन्ही अंतराळवीरांच्या सुरक्षेबाबत काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. ते अगदी उत्तम स्थितीत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या