Home / News / स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या दुप्पट होणार

स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या दुप्पट होणार

मुंबई – शासन मालकीच्या जागेतील १६ हजार ८८५ अंगणवाड्या गेल्या ३ वर्षात स्मार्ट करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री...

By: E-Paper Navakal

मुंबई – शासन मालकीच्या जागेतील १६ हजार ८८५ अंगणवाड्या गेल्या ३ वर्षात स्मार्ट करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत दिली. स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या दुप्पट करण्यात येणार असून ज्या अंगणवाड्या भाड्याच्या जागांमध्ये आहेत त्यांचे भाडे दुप्पट करण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.त्या म्हणाल्या की, भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. राज्यात सध्या एकूण १ लाख १० हजार ५५६ अंगणवाडी केंद्रे असून यापैकी ७२ हजार ३७९ शासनाच्या मालकीची आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या