Home / News / गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

पणजी- गोव्यातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. मडगावसारख्या शहरात भटक्या कुत्र्‍यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली होती. आता अनेक गावांमध्येही भटक्या कुत्र्यांचा...

By: E-Paper Navakal

पणजी- गोव्यातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. मडगावसारख्या शहरात भटक्या कुत्र्‍यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली होती. आता अनेक गावांमध्येही भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कुत्री समुद्र किनार्‍यांवर वावरताना दिसतात.गेल्या चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी ११ जणांना चावा घेतल्याची नोंद झाली असल्याची माहिती दृष्टी मरीन संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यातील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांमध्ये देशी, विदेशी पर्यटक,बॉलिवुड अभिनेत्री,दृष्टी जीवरक्षक तसेच स्थानिकांचा समावेश आहे.बाणावली किनार्‍यावर एप्रिलमध्ये कॅनडातील आणि रशियातील महिलेचा कुत्र्यांनी चावा घेतला होता.तसेच मे महिन्यात कोलवा किनारी बॉलीवूड अभिनेत्री रय्या लबीब यांच्यावरही पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला होता. लोटली येथील एका स्थानिक महिलेचा भटक्या कुत्र्यांनी सहा ते सात वेळा चावा घेतला होता. बेताळभाटी,कळंगुट आणि बाणावली समुद्र किनारी गस्त घालणाऱ्या तीन दृष्टी जीवरक्षकांनाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या