Home / News / नीट सुनावणी पुढे ढकलली आता १८ जुलै रोजी होणार

नीट सुनावणी पुढे ढकलली आता १८ जुलै रोजी होणार

नवी दिल्ली – नीट – यूजी पेपरफुटी प्रकरणाची महत्वपूर्ण सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पुढे ढकलली. पेपरफुटीमुळे ही परीक्षा...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – नीट – यूजी पेपरफुटी प्रकरणाची महत्वपूर्ण सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पुढे ढकलली. पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली आहे.आजच्या सुनावणीत न्यायालय याबाबत निकाल देणे अपेक्षित होते.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे बी पारडीवाला आणि न्या.मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपिठासमोर ही सुनावणी सुरू आहे.या परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात केंद्र सरकार आणि ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आपापली भूमिका काल सर्वोच्च न्यायालयात लेखी स्वरुपात सादर केली होती. नीट-यूजी परीक्षा रद्द करू नये असे एनटीएचे म्हणणे आहे.त्यानंतर आज सीबीआयने सविस्तर तपास अहवाल मोहोरबंद लिफाफ्यामध्ये न्यायालयाला सोपवला.या परीक्षेचे पेपर दिल्लीच्या हजारीबाग येथील ओअॅसीस स्कूलमधून चोरीला गेले ,असा दावा यापूर्वी सीबीआयने केला होता.तर पेपर फुटला हे स्पष्ट आहे,असे निरीक्षण न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान नोंदविले आहे.या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या