Home / News / मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा जीआर निघाला

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा जीआर निघाला

मुंबई- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शासकीय जीआर निघाला आहे. या योजनेद्वारे राज्यातील जनतेला सरकार देवदर्शन घडवून आणणार आहे. या योजनेसाठी...

By: E-Paper Navakal

मुंबई- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शासकीय जीआर निघाला आहे. या योजनेद्वारे राज्यातील जनतेला सरकार देवदर्शन घडवून आणणार आहे.

या योजनेसाठी पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. ही योजना 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला यात्रेकरूंना भेट देता येणार आहे. लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. या सदर योजनेच्या नियमनासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.

या योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थस्थानांचा समावेश करण्यात आला आहे. केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येणार आहे. या महत्त्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. या योजनेच्या जीआरमध्ये अटी, शर्ती, नियम वय आदींची सर्व माहिती देण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या