Home / News / पेट्रोल -डिझेलच्या दरात पाकिस्तानात मोठी वाढ

पेट्रोल -डिझेलच्या दरात पाकिस्तानात मोठी वाढ

नवी दिल्ली – आर्थिक विवंचनेत असलेल्या पाकिस्तानातील नागरिकांना आता आणखी एक धक्का बसला असून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – आर्थिक विवंचनेत असलेल्या पाकिस्तानातील नागरिकांना आता आणखी एक धक्का बसला असून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. पेट्रोलच्या दरात १० रुपये तर डिझेलच्या दरात६ रुपये १८ पैसे वाढ करण्यात आली आहे. १५ जुलै पासून ही नवी दरवाढ लागू झाली आहे.पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात गेले काही दिवस मोठी वाढ पाहायला मिळत असून पेट्रोलचे दर लिटरमागे २८४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या पंधरा दिवसात पाकिस्तानाने दुसऱ्यांदा ही दरवाढ केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाई कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून कर्जही घेण्यात आले असले तरी पाकिस्तानी सरकारला महागाई कमी करता आलेली नाही. त्यात पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे इतर वस्तूंच्याही दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या