उद्धव ठाकरे ४ ऑगस्टला दिल्लीच्या दौऱ्यावर

मुंबई – शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (उबाठा) पुढील महिन्यात ४ ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत,असे सांगण्यात आले आहे.राज्यातील महाविकास आघाडीतील जागावाटप समन्यायी व्हावे,असा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.