Home / News / ऑगस्ट महिन्यात बँका १३ दिवस बंद राहणार

ऑगस्ट महिन्यात बँका १३ दिवस बंद राहणार

नवी दिल्ली – देशातील विविध राज्यांमध्ये ७ दिवस सरकारी सुट्ट्या , २ शनिवार आणि ४ रविवार अशा एकूण १३ दिवस...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – देशातील विविध राज्यांमध्ये ७ दिवस सरकारी सुट्ट्या , २ शनिवार आणि ४ रविवार अशा एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील. १८ ऑगस्ट रोजी रविवार आणि १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनौसह अनेक ठिकाणी बँका बंद असतील. तर २६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशातील बहुतांश राज्यांत बँक हॉलिडे असेल.

Web Title:
संबंधित बातम्या