दौंड मार्गावर अपघातात पती-पत्नी जागीच ठार

दौंड :

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद येथे दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही जागीच ठार झाले. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दत्तात्रय गंगाधर यादव आणि सुमन दत्तात्रय यादव अशी मृतांची नावे आहेत.

मळद येथील दत्तात्रय यादव व त्यांची पत्नी सुमन यादव हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना घागरेवस्ती जवळ सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या लक्झरी बसने यादव दाम्पत्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यादव कुटुंब मुळचे खानदेशातील असून गेल्या काही वर्षांपासून मळद येथे स्थायिक झाले होते.