मुंबई- चतुरताईंच्या अकलेचे दार कधी उघडणार? असा सवाल करत शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या एका आंदोलनाचा फोटो म्हात्रे यांनी ट्विट केला आहे, या फोटोत प्रियंका चतुर्वेदी यांच्या गळ्यात कांद्याची माळ आहे. याचवरुन चतुर्वेदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, चतुरताईंच्या अकलेचे दार कधी उघडणार? यालाच म्हणतात, अकलेचे कांदे. चिऊसेनेच्या काऊताई. डायमंडचे कानातले. लुई व्हिटॉनची पर्स. आयफोन १५ हातात ठेवून महागाईबद्दल बोलत आहेत. एकतर आंदोलनाचा आणि आपला सबंध नाही आणि त्यात सुद्धा गरिबीची चेष्टा करत आहात.
