भरतपूर – भरतपूरच्या बयान येथील फरसो गावात बाणगंगा नदीच्या काठावरील तलावात एक तराफा उलटून ६ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी तराफ्यावर एकूण ८ मुले होती. त्यातील दोघांना वाचवण्यात आले.
सध्या राजस्थानात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे. बाणगंगा नदीची पातळी पाहण्यासाठी काही मुलांनी जवळच्याच डबक्यातील तराफा घेतला. ते जात असतांना अचानक आलेल्या वाऱ्याने हा तराफा उलटला व तुटून पाण्यात पडला. पाण्याची खोली अधिक असल्याने या मुलांना पोहोताही आले नाही. गावकऱ्यांनी धाव घेत दोन मुलांना सुखरुप वाचवले.