Home / News / अजित पवार शेताच्या बांधावर पीक पाहणीसह शेतकऱ्यांची विचारपूस

अजित पवार शेताच्या बांधावर पीक पाहणीसह शेतकऱ्यांची विचारपूस

अंमळनेर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान आज अंमळनेर येथे शेताच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. जळगाव दौऱ्यादरम्यान अजित पवार शेतकर्‍यांच्या बांधावर गेले. तिथे पिकांची पाहणी करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि अनिल पवार उपस्थित होते. यानंतर अजित पवार यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत दुपारचे जेवण घेतले. तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

मालेगाव दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या जीवाला धोका असल्याची सूचना गुप्तचर विभागाने दिली आहे. त्यावर, माय माऊलींनी बांधलेल्या राख्या माझ्या हातावर असेपर्यंत मला कसलीही भीती नाही. बहि‍णींचे आशीर्वाद, राखीचे कवच माझे रक्षण करतील, असे अजित पवार यांनी धुळे येथील सभेदरम्यान सांगितले.