नवीदिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. त्याबरोबर त्यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद होणार आहे. स्वातंत्र्यदिनी देशाला सलग ११ वेळा संबोधित करणारे मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत. याआधी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग १७ वेळा. तर त्यांच्या कन्या दिवंगत इंदिरा गांधी यांनी एकूण १६ वेळा आणि सलग ११ वेळा देशाला स्वातंत्र्यदिनी संबोधित केले होते
