Home / News / शरद पवार गटातील पक्षांतर्गत गटबाजी उफाळली! जयंत पाटील संतापले

शरद पवार गटातील पक्षांतर्गत गटबाजी उफाळली! जयंत पाटील संतापले

जालना- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिव स्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटची सभा आज जालना जिल्ह्यातील...

By: E-Paper Navakal

जालना- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिव स्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटची सभा आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे वादळी ठरली.या सभेवेळी जाफराबाद येथील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष सुरेखा लहाने यांचे भावी आमदार अशा आशयाचा युवकांनी पोस्टर झडकवताच चंद्रकांत दानवे यांचे समर्थक प्रचंड संतापले. जयंत पाटलांच्या उपस्थितीत सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. भरसभेत जयंत पाटलांच्या उपस्थितीत दहा एक मिनिट हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे जयंत पाटील संतापले.

जयंत पाटील कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, मी भाषण करणार नाही, मला बेशिस्तपणा आवडत नाही. तुमच्या ज्या भावना आहे त्या पक्षापर्यंत पोहोचवा. मात्र बेशिस्तपणा अजिबात खपवला जाणार नाही.
गोंधळ शांत झाल्यावर जयंत पाटील यांनी भाषण केले. ते म्हणाले की, मराठवाड्याचा मोठा नेता पडत नाही, असे वाटत असलेला नेत्याला पाडण्याचा काम तुम्ही केले. संपूर्ण मराठवाड्यात भाजपाला तुम्ही हरवले. सरकार घाबरलेले आहे, नाहीतर हरियाणासोबत राज्याची विधानसभा निवडणूक घेतली असती. मागच्या निवडणुकीत पराभव झाला याचे करणे शोधा आणि सुधारणा करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमी शरद पवारांचा अपमान करतात आणि आमच्यातले गेलेले ऐकून घेतात. स्वाभिमान राहिला नाही, आतातर कंपनी लावली. कंपनीच्या सल्ल्यावर चालत आहे, माणुसकी, जिव्हाळा सगळे संपले आहे. मराठवाड्यात ही शेवटची सभा आहे. राजकारणात संयम असणे गरजेचे आहे. माझ्या विरोधात जे जे निवडणूक लढले ते पुढच्या निवडणुकीत माझे काम करतात. ही विधानसभा जिंकायची हे विसरू नका. महाविकास आघाडीची बैठक झाल्यावर उमेदवार घोषित होईल.

Web Title:
संबंधित बातम्या