Home / News / नेपाळ सरकारने उठवली टिकटॉकवरील बंदी !

नेपाळ सरकारने उठवली टिकटॉकवरील बंदी !

काठमांडू – नेपाळ सरकारने टिकटॉक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटवर घातलेली बंदी उठवली. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

By: E-Paper Navakal

काठमांडू – नेपाळ सरकारने टिकटॉक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटवर घातलेली बंदी उठवली. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही अटींसह टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी टिकटॉक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामध्ये एक करार करण्यात आला आहे.

प्रत्येक सोशल नेटवर्क आता सोशल नेटवर्क ऑपरेशन गाइडलाइन २०८० च्या कलम ३ अंतर्गत मंत्रालयात सूचीबद्ध केली जाणार आहे. त्यानंतर कलम ६ अंतर्गत या सोशल नेटवर्क साइटसाठी आचारसंहिता केली जाणार आहे. टिकटॉकच्या प्रतिनिधींनी नेपाळमध्ये सूचीबद्ध होण्यास सहमती दर्शविली आणि कराराचा मुद्दा निश्चित केला असे ते म्हणाले.याशिवाय टिकटॉकसमोर सरकारने आणखी चार अटी ठेवल्या आहेत. सरकारने ठरवलेल्या अटींचा उद्देश पर्यटनाला चालना देणे,डिजिटल सुरक्षा आणि साक्षरता आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक शिक्षण देणे हा आहे, असे गुरुंग म्हणाले.नेपाळने गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी टिकटॉकवर बंदी घातली होती.

Web Title:
संबंधित बातम्या