Home / News / खळ्याचा पूल धोकादायक मालदन रस्त्याचीही दुरवस्था

खळ्याचा पूल धोकादायक मालदन रस्त्याचीही दुरवस्था

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तळमावले – खळेमार्गे मालदनकडे जाणार्‍या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे खळ्याच्या पुलावरील संरक्षक पाईप...

By: E-Paper Navakal

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तळमावले – खळेमार्गे मालदनकडे जाणार्‍या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे खळ्याच्या पुलावरील संरक्षक पाईप उखडून पुरात वाहून गेले आहेत.त्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पूल आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी,अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे.

कराड- ढेबेवाडी रस्त्यावरील
खळे फाट्यापासून मालदन पर्यंतचा रस्ता वांग नदी पुलाजवळ उखडला आहे. रस्त्यावर ८ ते ९ इंचाचा खड्डा पडला आहे. मागील चार महिन्यांपासून रस्त्याची अशी अवस्था आहे. खळे बाजूकडून येताना उताराला सांडपाणी वाहून नेणारा नाला बुजल्याने पाणी रस्त्यावर येत आहे.त्यामुळे वाहनांना अडचणी निर्माण होत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या