Home / News / आटपाडीतील जवान शहीद! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आटपाडीतील जवान शहीद! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगली – आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑगस्ट रोजी शहीद झाले. ते शहीद झाल्याची...

By: E-Paper Navakal

सांगली – आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑगस्ट रोजी शहीद झाले. ते शहीद झाल्याची बातमी समजताच आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्यावर काल मायभूमीत मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते वर्षभराने निवृत्त होणार होते.

काकासाहेब पावणे यांचे शिक्षण विभूतवाडी येथे झाले. घरची आर्थिक परिस्थिती अडचणीची असली तरी त्यांनी जिद्द आणि चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण करत सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. ते केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भावजय, मुले असा परिवार आहे. रविवारी सीआरपीएफच्या जवानांनी त्यांना सलामी दिली, त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:
संबंधित बातम्या