Home / News / कशेडी बोगद्याची मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत सुरू करणार

कशेडी बोगद्याची मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत सुरू करणार

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणार्‍या कशेडी बोगद्यामधील दुसरी मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन गणेशभक्तांसाठी खुली...

By: E-Paper Navakal

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणार्‍या कशेडी बोगद्यामधील दुसरी मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन गणेशभक्तांसाठी खुली करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार भरत गोगावले यांनी कशेडी बोगद्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठेकेदारांनी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या वापर करुन दिवसरात्र काम करुन कशेडी बोगद्यातील दुसरा भोगदा ३ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून ग्रीन फिल्ड महामार्ग मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत करणार आहेत. राज्य सरकार कोकणचा परिपूर्ण विकास करत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या