Home / News / समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा! महिनाभरापूर्वीच झाली होती दुरुस्ती

समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा! महिनाभरापूर्वीच झाली होती दुरुस्ती

छत्रपती संभाजीनगर- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. याच समृद्धी...

By: E-Paper Navakal

छत्रपती संभाजीनगर- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. याच समृद्धी महामार्गावर ११ जुलैला छत्रपती संभाजीनगरपासून जवळ असणाऱ्या माळीवाडा इंटरचेंजवळ ३ सेंटीमीटर रुंदीच्या ५० फुट लांबीच्या भेगा पडल्या होत्या. यानंतर एमएसआरडीसीने या भेगा सिमेंटने बुजवल्या होत्या. मात्र आता या भेगांमधील सिमेंट बाहेर पडून या भेगा पुन्हा उघड्या पडल्या आहेत. यामुळे समृद्धी महामार्गाची निर्मिती आणि दुरुस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्ग तयार करण्यासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडणार नाही असा दावा एमएसआरडीसीने केला होता, मात्र आता त्यांचा हा दावा फोल ठरला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या