Home / News / शेअर बाजारात सलग दहाव्या दिवशी तेजी

शेअर बाजारात सलग दहाव्या दिवशी तेजी

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ७३ अंकांनी वाढून ८१,७८५...

By: E-Paper Navakal

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ७३ अंकांनी वाढून ८१,७८५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने २५,१२९ अंकांचा नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर निफ्टी ३४ अंकांनी वाढून २५,०५२ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टीत मात्र आज काहीशी घसरण झाली. बँक निफ्टी १३४ अंकांनी घसरून ५१,१४३ अंकांवर बंद झाला. आयटी शेअरमध्ये आज सर्वाधिक वाढ दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक ६८५ अंकांच्या वाढीसह बंद झाला. औषध निर्मिती, पायभूत सुविधा आणि आरोग्यनिगा या क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली.मात्र बँकिंग, वाहन उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू, ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले.

Web Title:
संबंधित बातम्या