Home / News / जम्मू-काश्मीर चकमकीत ३ दहशतवाद्यांचा ठार

जम्मू-काश्मीर चकमकीत ३ दहशतवाद्यांचा ठार

कुपवाडा – जम्मू काश्मीरच्या कुपवाडासह इतर दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विघ्न आणण्याच्या दृष्टीने...

By: E-Paper Navakal

कुपवाडा – जम्मू काश्मीरच्या कुपवाडासह इतर दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विघ्न आणण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून काही दहशतवादी आल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर या ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

काल जम्मू-काश्मीरमध्ये तीन चकमकी झाल्या. राजौरीमधील खेडी मोहरा लाठी व दंथल विभागात रात्री चकमक झाली. तर कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार आणि माछीलमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार कंठस्नान घालण्यात आले. यातील २ दहशतवाद्यांना माछील गावात तर एकाला तंगधार मध्ये मारण्यात आले. राजौरी जिल्ह्यातही सुरक्षा दलाबरोबर मोठी चकमक झाली. लष्कराने या भागात घेराबंदी केली आहे. लष्कराने विविध भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक कठोर केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या