मुंबई – सलग दहा दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. मात्र दिवसभरात घसरणीतून सावरत बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८२,२८५ च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५,१९२ च्या विक्रमी पातळीवर पोहोचला. बाजार बंद होताना निफ्टी ९९ अंकांनी वाढून २५,१५१ अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्स ३४९ अंकांनी वाढून ८२,१३४ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टी ८ अंकांनी वाढून ५१,१५२ अंकांवर बंद झाला. आज ऑटोमोबाईल आणि एफएमसीजी निर्देशांकात सर्वाधिक वाढ दिसून आली.
