Home / News / मुंबईतील फेरीवाला समित्यांच्या निवडणुकीत ४९.४६ टक्के मतदान

मुंबईतील फेरीवाला समित्यांच्या निवडणुकीत ४९.४६ टक्के मतदान

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील फेरीवाला अर्थात नगर पथविक्रेत्यांच्या विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण आठ समित्यांसाठी सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले. मतमोजणी आणि निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे.

या निवडणुकीसंदर्भात पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ एक- ४३ टक्के,परिमंडळ दोन- ३५.५७ टक्के, परिमंडळ तीन-३४.९ टक्के, परिमंडळ चार- ४४.१६ टक्के, परिमंडळ पाच- ५२.५४ टक्के, परिमंडळ सहा- ५८.५०, तर परिमंडळ सात- ६३.५१ टक्के इतके मतदान झाले.या निवडणुकीसाठी पात्र २३७ उमेदवारांची अंतिम यादी गेल्या मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली होती.२३७ उमेदवारांपैकी १९० पुरुष तर ४७ महिला उमेदवारांचा समावेश आहे.मतमोजणी आणि निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे.या निवडणुकीतील मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या असून न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

Share:

More Posts