Home / Uncategorized / जायकवाडी धरणाचापाणीसाठा ७६ टक्क्यांवर

जायकवाडी धरणाचापाणीसाठा ७६ टक्क्यांवर

औरंगाबाद – जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७६ टक्क्यांवर पोहचला असून माजलगाव धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. माजलगाव धरणासाठी १०० क्युसेकने विसर्ग सुरू असून टप्प्याटप्प्याने या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. कालवा परिसरातील साधन-सामुग्री आणि जनावरेंचे नुकसान होणार नाही, याची लोकांना दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.