Home / News / राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी चैत्यभूमीला भेट देत अभिवादन करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी चैत्यभूमीला भेट देत अभिवादन करणार

मुंबईभारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी दुपारी...

By: E-Paper Navakal

मुंबई
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 .३० वाजता भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी भेट द्यावी अशी विनंती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना केली होती. रामदास आठवले यांच्या विनंतीनुसार राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांनी मुंबई भेटीत चैत्यभूमीला भेट देण्याचा निर्णय घेतला.

Web Title:
संबंधित बातम्या