Home / News / मुंबईतील मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द

मुंबईतील मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द

मुंबई- मुंबईत विकत घेतलेल्या मालमत्तेच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे.राज्य सरकारच्या महसुल विभागाने मालमत्ता नोंदणीसाठीची हद्दीची.अट रद्द...

By: E-Paper Navakal

मुंबई- मुंबईत विकत घेतलेल्या मालमत्तेच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे.
राज्य सरकारच्या महसुल विभागाने मालमत्ता नोंदणीसाठीची हद्दीची.अट रद्द केली.यासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे जर एखाद्याने मुलुंडमध्ये घर खरेदी केले आणि.ती व्यक्ति अंधेरीत राहत असेल तर त्याला दस्त नोंदणीसाठी मुलुंडच्या नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.त्याला दस्त नोंदणी अंधेरीच्या कार्यालयातूनही करता येऊ शकेल.बुधवारी राज्य शासनाच्या महसूल विभागाने एक अधिसूचना जारी केली.ज्याद्वारे सर्व रजिस्ट्रेशन कार्यालयांचे एकीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.यापुढे दस्त नोंदणी कार्यालये मुंबई-फोर्ट,
मुंबई-अंधेरी,मुंबई-कुर्ला अशी ओळखली जाणार नाहीत तर ती मुंबई शहरे आणि मुंबई उपनगरे अशी म्हणून ओळखली जातील.

हा निर्णय सध्या फक्त मुंबई महापालिका हद्दीसाठी घेण्यात आला आहे.सध्या मुंबईमध्ये एकूण ३२ उपनिबंधक कार्यालये आहेत.यातील २६ कार्यालये ही उपनगरात आहेत तर ६ कार्यालये मुंबई शहरात आहेत.याठिकाणी मालमत्तेच्या दस्त नोंदणीसंदर्भातील कामे केली जातात.महसूल विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांचा दस्त नोंदणी कार्यालयात येण्या-जाण्याचा वेळ वाचणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या