राहुल गांधीचे अमेरिकेत मोठ्या उत्साहात स्वागत

टेक्सास-लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे आज टेक्सासच्या डलास विमानतळार आगमन झाले. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पिट्रोडा व इतरांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी विमानतळावर भारतीय नागरिकांनी एकच गर्दी केली होती. भारतीय महिलांनी राहुल गांधी यांचे विमानतळावर औक्षणही केले.राहुल गांधी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आले असून लोकसभा निवडणुकीनंतरचा त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकेतील या उत्साही स्वागताने मी भारावून गेलो आहे. या दौऱ्यात भारत अमेरिका संबंध अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी काही महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होणार आहे.