Home / News / भारताकडून ऑस्करसाठी’लापता लेडीज’ची निवड

भारताकडून ऑस्करसाठी’लापता लेडीज’ची निवड

नवी दिल्ली – ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताकडून ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताकडून ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.किरण राव हिने दिग्दर्शित केलेला लापता लेडीज हा चित्रपट २९ चित्रपटांच्या यादीतून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. या यादीत बॉलिवूडचा ॲनिमल, राष्ट्रीय पुरस्कार विजता मल्याळम चित्रपट आट्टम आणि कान फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आलेला ऑल वुई इमॅजिन इज लाइट या चित्रपटांचा समावेश होता. लापता लेडीज यावर्षी १ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. आमीर खान प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रवि किशन आणि छाया कदम यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या