सिनेट निवडणुकीवर उद्या सुनावणी

मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारकडून सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यानंतर युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला तडाखा देत ही निवडणूक२४ सप्टेंबरला घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र स्टुडन्ट युनियनचे सिद्धार्थ इंगळे यांच्याकडून याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून मतदान प्रक्रियेला कुठल्याही प्रकारे स्थगिती देण्यात आलेली नाही.