वाशिंग्टन – संपूर्ण जगावर वचक असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या पाळीव कुत्र्यामुळे त्रस्त आहेत . त्यांचा हा पाळीव कुत्रा आतापर्यंत १० जणांना चावला आहे. या कुत्र्यामुळे बायडेन यांच्यासह त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. खास करून व्हाईट हाऊस मधील कर्जोमचारी आणि अधिकार्यान्म्धेही या पाळीव कुत्र्याची प्रचंड दहशत आहे. बायडेन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कमांडर नावाचा एक जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा पाळला आहे. २०२१ साली छोट्या पिल्लाच्या रूपात कमांडरने व्हाइट हाउसमध्ये प्रवेश केला. दिवसभराच्या कामाचा ताण हलका व्हावा नि विरंगुळ्याचे काही क्षण घालवता यावेत हा प्राणी पाळण्याचा एक हेतू असतो; मात्र या कमांडरने अनेकांना चावे घेऊन बायडेन कुटुंबीयांच्या चिंतेत भर घातली आहे. कमांडर अनेकांना चावला आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिलं आहे. त्यामुळे या पाळीव कुत्र्याचे करायचे काय करायचे असा प्रश्न बायडन यांना पडला आहे.असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
