Home / News / वाराणशीतील अपघातातचार भाविकांचा मृत्यू

वाराणशीतील अपघातातचार भाविकांचा मृत्यू

वाराणसी- वाराणसी जिल्ह्याच्या कछवा मार्गावर मिर्जामुराद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बिहाडा गावाजवळ झालेल्या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील...

By: E-Paper Navakal

वाराणसी- वाराणसी जिल्ह्याच्या कछवा मार्गावर मिर्जामुराद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बिहाडा गावाजवळ झालेल्या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील १२ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. वाराणशीच्या मंडुवाडीह पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणारे पांडे कुटुंबीय विंध्यांचल येथे दर्शनासाठी गेले होते. ते परतत असताना आज पहाटे त्यांची भरधाव कार धाब्याजवळ उभ्या असलेल्या डंपरवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी रस्त्यावर फिरत असलेल्या लोकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. डंपरचालक डंपर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी रोखून पोलिसांच्या ताब्यात दिला.

Web Title:
संबंधित बातम्या