Home / News / राज्यात सर्वांनी गद्दारीच केली! संभाजीराजेंचा मेळाव्यात हल्लाबोल

राज्यात सर्वांनी गद्दारीच केली! संभाजीराजेंचा मेळाव्यात हल्लाबोल

पुणे- महाविकास आघाडी स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली .त्यानंतर शिंदे व अजित पवार यांनीही गद्दारी केली असल्याचा हल्लाबोल...

By: E-Paper Navakal

पुणे- महाविकास आघाडी स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली .त्यानंतर शिंदे व अजित पवार यांनीही गद्दारी केली असल्याचा हल्लाबोल आज संभाजीराजे यांनी केला. ते आज महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्यात बोलत होते.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, शरद पवार काँग्रेसमध्ये असतांना देशाचे नेते झाले. त्यानंतर त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. प्रबोधनकार व बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करुन काँग्रेसला विरोध केला आता उद्धवजी काँग्रेसबरोबर आहेत. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर टीका केली व घोटाळे बाहेर काढले, आता त्यांच्याच सोबत सत्ता स्थापन केली. हे पटण्यासारखे नाही. आम्ही कोणावरही टिका करणार नाही. सगळ्या पक्षांच्या लोकांना फसवण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. सरकार लाडकी बहीण योजना सुरू करते, पण जीएसटी किती घेते याचा विचारही करायला हवा. आता स्वप्न साकार करण्यासाठी लढणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या