Home / News / दानशूरपणाचा वारसा पुढे चालू’टाटा’च्या कामगारांचा बोनस जमा

दानशूरपणाचा वारसा पुढे चालू’टाटा’च्या कामगारांचा बोनस जमा

मुंबई – उद्योग विश्वात अत्युच्च शिखर गाठताना सामाजिक जाणिवांचे भान राखणारे, समाजातील गोरगरीबांच्या हितासाठी झटणारे दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १० ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला अवघा एक दिवस उलटत नाही तोच टाटा समूहाने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस द्यायला सुरुवात केली.कालपासून बोनसचे ४९ हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले.रतन टाटांच्या दानशूरपणाचा वारसा त्यांच्या पश्चात टाटा समूहाने अबाधित राखला हे पाहून कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आले.रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या उद्योग जगतावर शोककळा पसरली. टाटा कुटुंबीय आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.पण अशा कठीण प्रसंगातही टाटा समूहाने रतन टाटा यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली.टाटा समूहाची ही कृती म्हणजे रतन टाटा यांना दिलेली सर्वश्रेष्ठ मानवंदना ठरली आहे.