नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट मिळाली असून मंत्रीगटाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आधी ४२ टक्के असलेला हा महागाई भत्ता आता ४५ टक्के झाला आहे.महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलैपासून लागू होणार असून त्याचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या वेतनात ३ महिन्याची थकबाकीही मिळणार आहे. याचा लाभ देशभरातील १ कोटी १५ लाख कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ होत असते. या वर्षीच्या जुलै महिन्यात या वाढीची घोषणा करण्यात आली नव्हती ती आज दिवाळीच्या आधी करण्यात आली आहे.
