Home / News / नाशकात व्यापाऱ्याच्या खळ्यातून कांदा चोरी

नाशकात व्यापाऱ्याच्या खळ्यातून कांदा चोरी

नाशिक- पिंपळगाव बसवंत तालुक्यातील कांदा खळ्यावर असणार्या सीसीटीव्हीची मोडतोड करून १४ ते १५ गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उंबरखेड रोड...

By: E-Paper Navakal

नाशिक- पिंपळगाव बसवंत तालुक्यातील कांदा खळ्यावर असणार्या सीसीटीव्हीची मोडतोड करून १४ ते १५ गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उंबरखेड रोड येथे घडली आहे.
पिंपळगाव येथील कांदा व्यापारी हर्षल खाबिया यांचे उबंरखेड रोडवर कांद्याचे खळे आहे.या ठिकाणावरून मध्यरात्री चोरट्यांनी गाडीमध्ये येऊन कांद्यांची चोरी केली.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडण्याचा प्रयत्न करून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणारा डीव्हीआरही चोरून नेला. उंबरखेड रोड येथील किराणा दुकानाचेदेखील शटर तोडून चोरी प्रयत्न करण्याचा प्रकार घडला झाला.शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीचे सत्र वाढत असून यापूर्वीही चिंचखेड रोड परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. हर्षल खाबिया यांच्या खळ्यावर चोरी झाल्यानंतर शहरातील कांदा असोसिएशनने पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना निवेदन देत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या