Home / News / गुजरातमध्ये दिवाळीची सलग तीन दिवस सुट्टी

गुजरातमध्ये दिवाळीची सलग तीन दिवस सुट्टी

गांधीनगर – दिवाळीनिमित्त सलग सुट्टीचा आनंद लोकांना घेता यावा यासाठी गुजरात सरकारने यंदा १ नोव्हेंबर रोजी सरकारी सुट्टी जाहीर केली...

By: E-Paper Navakal

गांधीनगर – दिवाळीनिमित्त सलग सुट्टीचा आनंद लोकांना घेता यावा यासाठी गुजरात सरकारने यंदा १ नोव्हेंबर रोजी सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्याऐवजी ९ नोव्हेंबर रोजी शनिवारी सर्व शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत.गुजरातमध्ये दिवाळीची सुट्टी ३१ ऑक्टोबर रोजी आहे. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी गुजराती नववर्षानिमित्त सरकारी सुट्टी आहे. म्हणूनच ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर अशी तीन दिवस सलग सुट्टी मिळावी यासाठी १ नोव्हेंबर रोजी सरकारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या