Home / News / टीव्ही पाहणे महागणार १८ टक्के जीएसटी लागून

टीव्ही पाहणे महागणार १८ टक्के जीएसटी लागून

नवी दिल्ली- यावर्षी जुलै महिन्यात मोबाईल रिचार्ज महाग झाले. त्यानंतर आता टीव्ही बघणे महाग होणार आहे.केंद्र सरकारने नुकताच चॅनेलच्या शुल्कामध्ये...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- यावर्षी जुलै महिन्यात मोबाईल रिचार्ज महाग झाले. त्यानंतर आता टीव्ही बघणे महाग होणार आहे.केंद्र सरकारने नुकताच चॅनेलच्या शुल्कामध्ये वाढ आणि १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला.मात्र या निर्णयाला तामीळनाडूसह देशभरातून विरोध होऊ लागला आहे.

ट्रायने केबल टीव्ही चॅनेलच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. जीएसटी १८ टक्के लावला आहे. याविरोधात केबल टीव्ही ऑपरेटरने नाराजी व्यक्त केली असून जीएसटी ५ टक्के करण्याची मागणी केली आहे.चेन्नईचे केबल टीव्ही ऑपरेटर या नियमाला विरोध करत आहेत.जीएसटी कमी करण्यासाठी दबाव टाकत आहेत.जीएसटी वाढण्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल. महिन्याचे रिचार्ज ५०० रुपये असेल तर आता ९० रुपये जास्त द्यावे लागतील. एक हजार रुपयाच्या रिचार्जवर १८० रुपये जास्त द्यावे लागतील. १५०० रुपयांच्या रिचार्जवर २७० रुपये जास्त भुर्दंड पडेल. त्यामुळे केबल टीव्ही पाहणार्‍यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. टीव्ही पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांत नाराजी आहे. काही महिन्यांपूर्वी मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग झाले. त्यानंतर जियो, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया युजर्स नाराज झाले. मोबाईल रिचार्ज पाठोपाठ आता केबल टीव्ही पाहणेही महागणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या