Home / News / वायनाडमधील प्रचार संपला राहुल गांधी , प्रियांकाचा रोडशो

वायनाडमधील प्रचार संपला राहुल गांधी , प्रियांकाचा रोडशो

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज वायनाडमध्ये राहुल गांधी व उमेदवार प्रियांका गांधी यांनी दोन...

By: E-Paper Navakal

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज वायनाडमध्ये राहुल गांधी व उमेदवार प्रियांका गांधी यांनी दोन रोड शो केले. या रोडशोला वायनाडमधील नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या रोडशोला विजयी मिरवणुकीचे स्वरुप प्राप्त झाले.काँग्रेस नेते व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. ते रायबरेली व वायनाड या दोन्ही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर त्यांनी वायनाड या लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला. या ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून काँग्रेसकडून प्रियांका गांधी या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. गेल्या वीस दिवसांपासून त्या वायनाडमध्येच तळ ठोकून असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी रोड शो द्वारे प्रचार केला. सकाळी व संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी यांनी गावागावात जात व चौकसभा घेत प्रचार केला होता. त्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोडही उठवली होती. त्या आता किती मताधिक्याने विजयी होणार याचा निर्णय महाराष्ट्राच्या निकालाबरोबरच म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या