वॉशिंग्टन – रशियाच्या महत्वाच्या शहरांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेने पुरविलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने मान्यता दिली आहे,अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.रशियाने युध्द छेडल्यापासून गेल्या दीड एक वर्षांत युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर दार्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची योजना आखली आहे. ती राबविण्यासाठी युक्रेनला अमेरिकन सरकारची मंजुरी आवश्यक होती. बायडन सरकारने ती मंजुरी दिली आहे,असे अधिकाऱ्याने सांगितले.अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी २०२५ रोजी पदाची शपथ घेणार आहेत. तोपर्यंत बायडेन हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पदावरून पायउतार होण्यापूर्वी त्यांनी युक्रेनला दिलेली मंजुरी महत्त्वाची मानली जात आहे.
