Home / News / मतदानाआधी डहाणूचे बाविआ उमेदवार भाजपात

मतदानाआधी डहाणूचे बाविआ उमेदवार भाजपात

डहाणू – विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपा व बाविआ यांच्यात भाजपा नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटपावरून नाट्य रंगलेले असतानाच डहाणू...

By: E-Paper Navakal

डहाणू – विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपा व बाविआ यांच्यात भाजपा नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटपावरून नाट्य रंगलेले असतानाच डहाणू मतदारसंघातील बाविआचा उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे डहाणू मतदारसंघात भाजपाची ताकत वाढली आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केल्याने चर्चेला उत आला होता.
भाजपात प्रवेश केल्यावर पाडवी यांनी डहाणू मतदारसंघातील भाजपा उमेदवार विनोद मेढा यांना आपला पाठिंबा दिला आहे. भाजपात प्रवेश का केला, असे विचारले असता पाडवी म्हणाले की, निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराला मते मिळावीत, यासाठीच मी भाजपात प्रवेश केला.
या राखीव मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद निकोले निवडणूक लढवत असून गेल्या वेळी त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता.

Web Title:
संबंधित बातम्या