नवी दिल्ली – दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत कोर्ट रुम १२ ला आज दुपारी अचानक आग लागली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रुम ११ आणि १२ मध्ये सुरु असलेले कामकाज काही काळ स्थगित करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग विझविली. . या आगीत कोणतीही हानी झालेली नाही. तसेच आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. आग विझवल्यानंतर न्यालायातील सुनावणी कामकाज पूर्ववत सुरु झाले होते.
