Home / News / भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे दीर्घ आजाराने निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे दीर्घ आजाराने निधन

नाशिक- भाजपाचे ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांचे आज संध्याकाळी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांना 15 ऑक्टोबरला अहमदनगरच्या राजूर येथील राहत्या घरी ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता.तेव्हापासून त्यांच्यावर नाशिकच्या नाइन पल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी 1980 ते 2004 या काळात अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा काम केले होते. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे सदस्य होते. परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भाजपात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले होते.