पटना- बिहारमधील दरभंगा येथे काल बाजीतपूर येथील मशिदीजवळ राम विवाहाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. विवाहपंचमीनिमित्त तरौनी गावातून मिरवणूक काढली होती. या वेळी एका समुदायाच्या लोकांनी आधी मिरवणूक थांबवली आणि नंतर लाठीमार करायला सुरुवात केली. यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली . परिस्थिती इतकी बिकट झाली की, रस्त्यावर सर्वत्र फक्त दगडच दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यात तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच राम विवाहाच्या मिरवणुकीवर दगडफेक केल्याची माहिती आहे.
