Home / News / मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचा शिंदे गटात प्रवेश

मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचा शिंदे गटात प्रवेश

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणारा मनसे कार्यकर्ता सचिन गालट यांनी शिंदेंच्या...

By: E-Paper Navakal

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणारा मनसे कार्यकर्ता सचिन गालट यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला . माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. सचिन गालट यांची शिंदेंच्या शिवसेनेच्या बार्शी टाकळी तालुका प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
सचिन गालट यांनी ३० जुलै २०२४ रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती. गाडीच्या तोडफोड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन गालट आणि अमोल मिटकरींचे मनोमिलन होणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या