Home / News / शरद पवार २१ तारखेला मस्साजोग येथे जाणार

शरद पवार २१ तारखेला मस्साजोग येथे जाणार

केज – बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे बीडला...

By: E-Paper Navakal

केज – बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे बीडला जाणार आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरला संपणार आहे. हे अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी शनिवारी २१ डिसेंबरला बीड दौऱ्यावर जाणार आहेत.यावेळी ते मस्साजोग गावी जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच पोलीस तपास आणि अन्य परिस्थितीचा आढावा घेतील.

Web Title:
संबंधित बातम्या