इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’मध्ये काम करायचं आहे? कंपनीने भारतात सुरू केली भरती

Tesla Vacancy: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अब्जाधीश इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या अमेरिकेतील भेटीनंतर आता टेस्ला (Tesla) लवकरच भारतात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात टेस्लाच्या भारत प्रवेशाबाबत अनेक अडथळे आले. कधी उच्च आयात शुल्क ते कधी शेवटच्या क्षणी बैठक रद्द होण्यापर्यंत, अनेक कारणांमुळे टेस्लाची भारतात येण्याची योजना रद्द झाली. मात्र, कंपनी आता लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे कंपनीने भारतात नोकर भरती सुरू केली आहे.

कंपनीने आपल्या लिंक्डइन पेजवर 13 जागांच्या भरतीच्या पोस्ट केल्या आहेत. टेस्ला वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक पदे भरण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी सर्व्हिस टेक्निशियनआणि सल्लागार अशी किमान 5 पदे भरली जाणार आहेत. याशिवाय, कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि डिलिव्हरी ऑपरेशन्स स्पेशालिस्ट ही पदे मुंबईत भरली जाणार आहेत.

कंपनीकडून इनसाइड सेल्स अॅडव्हायझर, कस्टमर सपोर्ट सुपरवायझर, कस्टमर सपोर्ट स्पेशालिस्ट, सर्व्हिस अॅडव्हायझर, ऑर्डर ऑपरेशन्स स्पेशालिस्ट, सर्व्हिस मॅनेजर, टेस्ला अॅडव्हायझर, पार्ट्स अॅडव्हायझर, बिझनेस ऑपरेशन्स अॅनालिस्ट, स्टोअर मॅनेजर आणि सर्व्हिस टेक्निशियन ही पदे भरली जाणार आहेत.

टेस्लाने पोस्टमध्ये मुंबई व दिल्लीचा उल्लेख केल्याने, कंपनी या शहरांमध्ये ऑफिस सुरू करणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. इच्छुक व्यक्ती कंपनीच्या वेबसाइटवरून या पदांसाठी अर्ज करू शकतात.