IRCTC कडून वेळोवेळी प्रवाशांसाठी खास स्पेशल टूर पॅकेज सादर केले जाते. प्रामुख्याने धार्मिक पर्यटनाला चालणा देण्यासाठी रेल्वेकडून खास रेल्वे देखील चालवल्या जातात. रेल्वेकडून यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवली जाते. तुम्ही देखील कमी खर्चात देवदर्शन करण्याचा विचार करत असाल तर IRCTC ने खास पॅकेज सादर केले आहे.
IRCTC ने शिर्डी साई बाबांसह देशातील अनेक ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविणारे पॅकेज सादर केले आहे. 25 मार्च ते 4 एप्रिल 2025 पर्यंत ही यात्रा चालणार असून, यासाठी किमान भाडे प्रति व्यक्ती 20,700 रुपये आहे.
या पॅकेजमध्ये प्रवाशांना भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळेल. 25 मार्चला रीवा येथून हा प्रवास सुरू होईल, तर पुन्हा 4 एप्रिलला रीवा येथे प्रवास संपेल. एकूण 10 रात्र आणि 11 दिवसांचा हा प्रवास असेल. या टूर पॅकेजसाठी प्रवासी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctctourism.com वर ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
प्रवासाचे शुल्क किती?
या प्रवासासाठी तुम्हाला किमान 20,700 रुपये भरावे लागतील. यामध्ये तुम्ही स्लीपर क्लासमधून प्रवास करू शकता. तर थर्ड एसी पॅकेजसाठी प्रति व्यक्ती किमान 34,600 रुपये शुल्क लागेल. तसेच, फर्स्ट एसीमध्ये पॅकेज बुक करण्यासाठी किमान 45,900 रुपये खर्च करावे लागतील. या अंतर्गत मॉर्निंग टी, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर देखील मिळेल.
या टूर पॅकेजअंतर्गत यात्रेकरूंना देशातील विविध पवित्र ठिकाणांचे दर्शन घडवले जाईल. यात द्वारका येथे द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका मंदिर आणि नागेश्वर महादेव ज्योतिर्लिंग मंदिराचा समावेश आहे. सोमनाथ येथील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर पाहण्याची संधी मिळेल. नाशिक येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेता येईल. शिर्डी येथे साईबाबा मंदिरात भक्तांना दर्शन घेता येईल. पुणे येथे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचा समावेश आहे. तसेच, औरंगाबाद येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन या टूरमध्ये होणार आहे.