PM Mudra Yojana | केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (Mudra Yojana – PMMY) १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या उपक्रमाने 10 वर्षात देशातील सूक्ष्म उद्योजकतेला भक्कम आधार दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 8 एप्रिल 20150रोजी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 52कोटींपेक्षा जास्त कर्जे वितरित झाली असून त्यांची एकूण रक्कम 32.61 लाख कोटी रुपयामवर पोहोचली आहे.
गाव ते शहर, छोट्या उद्योजकांची उभारी
लघु आणि मध्यम व्यवसायांना चालना देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही योजना ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पोहोचली आहे. एसकेओसीएच संस्थेच्या “Outcomes of Modinomics 2014–24” या अभ्यासानुसार, दरवर्षी सरासरी 5.14 कोटी रोजगारनिर्मिती झाली असून त्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी 2.52 कोटी रोजगार निर्माण (Employment Generation) झाले आहेत.
या योजनेंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष प्रगती झाली असून येथे आतापर्यंत 20,72,922 मुद्रा कर्जे मंजूर करण्यात आली आहेत.
महिला सक्षमीकरणाला नवे बळ
अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार, मुद्रा योजनेतील 70% हून अधिक लाभार्थी महिला उद्योजक (Women Entrepreneurs) आहेत. गेल्या 9 वर्षांत महिलांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत 13% च्या चक्रवाढ वार्षिक दराने (CAGR) वाढ झाली आहे. प्रति महिला कर्जाची रक्कम सरासरी 62,679 रुपयांवर पोहोचली आहे, तर प्रति महिला जमा वाढ 14% CAGR दराने वाढून 95,269 रुपये झाली आहे.
IMF नेही मान्य केलं भारताचं यश
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मुद्रा योजनेचे विशेष कौतुक करताना म्हटले की, “महिला उद्योजकतेवर केंद्रित आणि विनातारण कर्ज देणारी ही योजना एमएसएमई क्षेत्रात महिलांची उपस्थिती वाढवते आहे.” IMF च्या आकडेवारीनुसार, महिला मालकीच्या एमएसएमईंची संख्या आता 28 लाखांहून अधिक झाली आहे.
कर्ज खात्यांची विक्रमी वाढ, ‘किशोर’ कर्जाचा मोठा वाटा
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, या योजनेंतर्गत 52 कोटींहून अधिक कर्ज खाती उघडण्यात आली आहेत. यातून भारतातील उद्योजकीय चळवळीला बळ मिळाल्याचे स्पष्ट होते.
“किशोर” प्रकारात (रुपये 50,000 – रुपये 5 लाख) येणाऱ्या कर्जांची हिस्सेदारी 2016 मध्ये 5.9% वरून 2025 मध्ये 44.7% पर्यंत वाढली आहे, तर “तरुण” कर्जे (5 लाख – 10 लाख रुपये) देखील झपाट्याने वाढत आहेत. यामुळे केवळ नवीन व्यवसाय नव्हे, तर विद्यमान व्यवसायांचीही वाढ सक्षम झाल्याचे दिसून येते.